www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान उत्पादन बनवणाऱ्या इंटेक्स टेक्नॉलॉजी या कंपनीनं स्मार्टफोनच्या यादीत ‘एक्वा आय-४ प्लस’ नावाचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनची किंमत आहे केवळ ७,६०० रुपये. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ३जी युक्त अशा या हॅण्डसेटमध्ये पाच इंच डिस्प्ले आणि १.२ गीगाहर्ट्सचा ड्यूएल कोर प्रोसेसर आहे.
काय आहे फोनचे फिचर्स
ड्यूएल सीमकार्ड वापरु शकत असलेल्या या हॅण्डसेटमध्ये ५१२ एमबी रॅम
‘४जीबी’ची अंतर्गत मेमरी
दोन हजार एमएएच बॅटरी आहे.
अँड्रॉईड ४.२.२ जेली बीन
फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि १.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
फोनमध्ये आधीपासूनच ‘वी चॅट’ आणि ‘ओएलएक्स’ सारखे अॅप्स यात इंस्टॉल आहेत. सोबतच इंटेक्स क्लाऊड अॅपच्या माध्यमातून ५ जीबीचा क्लाऊड स्टोरेज पण फ्री दिला गेलाय.
हा फोन दोन पर्ल ब्लू आणि पर्ल व्हाईट या रंगांमध्ये उपलब्ध असेल. देशभरात ४० हजारहून अधिक स्टोअर्समध्ये फोन उपलब्ध असेल. इंटेक्स टेक्नॉलॉजी मोबाईल बिझनेस प्रमुख संजय कुमार कलिरोना म्हणाले, की ‘इंटेक्स एक्वा आय-४ प्लस’ हा फोन आजच्या ग्राहकांची प्रत्येक गरज पूर्ण करण्याच्या उद्देशानं डिझाईन केला गेलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.