पुणे : महेंद्र सिंह धोनी आता टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय, मात्र १९९ एकदिवशीय सामन्यांचं कॅप्टन पद भूषवल्यानंतर, धोनीला पुन्हा एकदा कॅप्टनपदाची सवय झाल्यासारखं झालं आहे. इंग्लंड विरोधात खेळण्यात येणाऱ्या एकदिवशीय सामन्यात काहीसं असंच चित्र होतं.
सामन्याचं २७ वं षटक सुरू होतं, हार्दिक पांड्या बॉलिंग करत होता, या षटकाचा शेवटचा बॉल इयान मॉर्गनच्या बॅटला लागली आणि धोनीच्या हातात बॉल आला. धोनीने केलेलं अपील अम्पायरने फेटाळलं.
यानंतर धोनी विसरला की तो आता कॅप्टन नाहीय, यानंतर लगेच धोनीने यूडीआरएस मागितला, यूडीआरएस मागण्याचा अधिकार कॅप्टनचा अशतो, मात्र दुसऱ्याच क्षणाला धोनीला हे ध्यानात आल्यानंतर, त्याने विराट कोहलीकडे पाहून यूड़ीआरएस मागण्याचा इशारा केला.
धोनीचा मान राखत कोहलीनेही यूडीआरएस मागितला आणि थर्ड अंपायरचा निर्णय मानून फिल्ड अंपायरने मॉर्गनला आऊट दिलं.
@msdhoni reviews instead of @imVkohli and he's spot on pic.twitter.com/EeshQ2RkF6
— Vinay mani tripathi (@eevinaymani) January 15, 2017