मुंबई : ज्याची गाणी ऑस्करला नॉमिनेट होतात असा भारतीय सुप्रिसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानचे गाणे कोणाला नाही आवडत. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्यासोबत गाणे करायला मिळण्याची संधी इंडस्ट्रीत जास्त कोणाला मिळत नाही. मात्र हे भाग्य भारताचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीला लाभले आहे.
विराटची खेळी तर आपण पाहिलीच आहे. वर्ल्ड कप आणि आयपीएलमध्ये विराटचा अनोखा अंदाज अनेकांनी अनुभवला आहे. मात्र हा विराट फक्त क्रिकेट पुरताच मर्यादीत नाही. विराटचे टॅलेंट आपण वेगवेगळ्या गोष्टींमधून अनुभवतो.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गोवा, कोची, हैदराबाद आणि बंगळुरु या आठ टीम्स प्रिमिअर फुत्सल लीगमध्ये भिडणार आहेत. फुत्सल हे फुटबॉलचं शॉर्टर व्हर्जन आहे. हा प्रकार युरोप आणि दक्षिण अमेरिकेत प्रसिद्ध आहे. या प्रिमिअर फुत्सल लीगचे अधिकृत अँथम विराटच्या आवाजात स्वरबद्ध झाले आहे. त्यातील काहीच भाग विराट गाणार आहे. १५ ते २४ जुलै दरम्यान हे सामने होतील.
‘नाम है फुत्सल' असे गाण्याचे बोल असून त्याचा म्युझिक व्हिडिओ येत्या एक-दोन आठवड्यांत लाँच होणार आहे. आठवड्याभरापासून या गाण्यावर काम सुरु असून विराटला यात रॅप पार्ट दिल्याचे रेहमान यांनी सांगितले. गाण्याचे बोल इंग्रजीत आहेत.
विराटने मात्र ए. आर. रेहमानसोबत गाणे गातांना मी थोडा नर्व्हस झालो असे सांगितले. गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नवीन असल्याचे त्यानी म्हटले आहे.
An honor to have spent some time with the legend, Mr. @arrahman. Genius at work & epitome of humility. Thank You Sir pic.twitter.com/SQOn8JxqVu
— Virat Kohli (@imVkohli) June 6, 2016