कराची : पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस आणि निवड समितीचे मुख्य हारुन रशीद यांनी बोलावलेल्या बैठकीदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला रडू कोसळले. अश्रूंसह आमिरने बैठकीत उपस्थित इतर खेळाडूंची माफी मागितली. त्यानंतर मात्र आमिरला माफ करण्यात आले.
आमिरच्या खेळण्याला इतर खेळाडूंचा विरोध होता. मोहम्मद हफीज आणि कर्णधार अजहर अली यांनी आमिरसोबत सराव करण्यास नकार दिला. आमिरने त्यानंतर युनूस आणि हारुन रशीद यांनी बोलावलेल्या बैठकीदरम्यान इतर खेळाडूंशी बातचीत केली. त्यानंतर इतर खेळाडूंनी त्याच्या सरावातील सहभागाबाबत सहमती दर्शवली होती.
आमिरला माहीत होते की त्याच्यामुळे शिबिरात तणाव निर्माण झालाय. त्यामुळे या बैठकीदरम्यान त्याला रडूच कोसळले. याप्रकऱणी त्याने सर्वांची माफीही मागितली. तसेच ज्यांना वाटतेय की मला दुसरी संधी मिळता कामा नये तर मी कँप सोडायला तयार आहे, असे तो यावेळी म्हणाला.