नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा अॅथलिट ऑस्कर पिस्टोरियला सहा वर्ष जेलची हवा खावी लागणार आहे.
यापैंकी १२ महिन्यांची शिक्षा त्यानं आधीच भोगली आहे. आपली गर्लफ्रेंड रीवा स्टीनकॅम्प हिच्या हत्याची पिस्टोरियसनं कबुली दिल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखीला देषी ठरवलं होतं.
दरम्यान, २०१३ मध्ये रीवा स्टीनकॅम्पची त्यानं आपल्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळेच कोर्टानं त्याला ही शिक्षा सुनावली. पॅराऑलम्पिक रनर पिस्टोरियाच्या या कृत्यामुळे अवघं क्रीडा जगत हळहळलं होतं. यानंतर कोर्टात पिस्टोरियसनं आपल्या बचावासाठी प्रयत्न केले. मात्र, कोर्टानं आता त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.