कबड्डीस्टार रोहित कुमारच्या पत्नीची आत्महत्या

भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू आणि प्रो कबड्डी लीगमध्ये दमदार कामगिरी करणारा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीये.

Updated: Oct 20, 2016, 08:38 AM IST
कबड्डीस्टार रोहित कुमारच्या पत्नीची आत्महत्या title=

नांगलोई : भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू आणि प्रो कबड्डी लीगमध्ये दमदार कामगिरी करणारा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीये.

रोहितची पत्नी ललिताच्या मृतदेहाच्या जवळ हातानी लिहिलेले पत्र तसेच मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केलेली ऑडिओ क्लिपही मिळाली. ललिताने आपल्या सुसाईट नोटमध्ये सासरच्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केलाय. 

रोहित आणि ललिताचे लग्न यावर्षी 11मार्चमध्ये झाले होते. रोहित स्पोर्टस कोट्यातून इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत आहे. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीचे सामने रोहित खेळलाय. तसेच प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सत्रात तो पाटणा पायरेट्सकडून खेळला होता. यंदा ऑगस्टमध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये तो बंगळूरु बुल्सकडून खेळला.