वॉर्नर-रोहित आज आमनेसामने

आयपीएलच्या दहाव्या हंगामात आज सनरायजर्स हैदराबाद पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. 

Updated: May 8, 2017, 04:53 PM IST
वॉर्नर-रोहित आज आमनेसामने

हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या हंगामात आज सनरायजर्स हैदराबाद पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. 

प्ले ऑफच्या दृष्टीने हैदराबादसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबईने आतापर्यंत 11 सामन्यांपैकी 9 सामने जिंकत आधीच प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केलंय. 

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हे दोन्ही संघ दुसऱ्यांना आमनेसामने येतील. याआधी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादला चार विकेटने हरवले होते. 

दरम्यान, आयपीएलच्या या हंगामात हैदराबादने घरच्या मैदानावर 6पैकी पाच सामने जिंकलेत. त्यामुळे या सामन्यात मुंबईने वॉर्नरच्या संघाला कमी लेखून चालणार नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x