सचिनला नाही कळलं डबल-ट्रिपल सेंच्युरी कशी करायची - कपिल देव

भारताचे माजी कॅप्टन कपिल देव यांनी म्हटलं की सचिन तेंडुलकरला कळत नव्हतं डबल आण ट्रिपल सेंच्युरी किंवा ४०० रन्स कशे बनवायचे. सचिनमध्ये ते टोक गाठण्याची क्षमता होती, पण तो 'मुंबई स्कूल ऑफ क्रिकेट'मध्ये फसलेला होता.

Updated: Oct 29, 2015, 04:39 PM IST
सचिनला नाही कळलं डबल-ट्रिपल सेंच्युरी कशी करायची - कपिल देव title=

दुबई: भारताचे माजी कॅप्टन कपिल देव यांनी म्हटलं की सचिन तेंडुलकरला कळत नव्हतं डबल आण ट्रिपल सेंच्युरी किंवा ४०० रन्स कशे बनवायचे. सचिनमध्ये ते टोक गाठण्याची क्षमता होती, पण तो 'मुंबई स्कूल ऑफ क्रिकेट'मध्ये फसलेला होता.

कपिलनं एका वृत्तपत्रासोबत केलेल्या बातचितमध्ये सांगितलं, 'मला चुकीचं समजू नका मात्र मला वाटतं सचिननं आपल्या प्रतिभेला न्याय दिला नाही. मला नेहमीच वाटतं त्यानं जे केलं त्यापेक्षा तो जास्त करू शकला असता.' कपिल देव पुढे म्हणाले, 'तो मुंबई क्रिकेटला जोडलेला राहिला.

आणखी वाचा - 'पुढच्या वर्ल्डकपपर्यंत धोनीनंच कॅप्टन्सी सांभाळावी'

त्याला निष्कलंक क्रिकेट खेळणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंपेक्षा विवियन रिचर्ड्ससोबत जास्त वेळ घालवायला पाहिजे होता.'

भारताला १९८३च्या वर्ल्डकप मिळवून देणारे कॅप्टन कपिल देव म्हणाले, 'सचिन खूप चांगला खेळाडू होता पण त्याला फक्त सेंच्युरी करता यायची. डबल-ट्रिपल सेंच्युरी आणि ४०० रन्स कसे करायचे कळत नव्हतं.' सचिननं सेहवाग सारखं खेळावं असा सल्ला मी त्याला द्यायचो, असंही देव म्हणाले. 

आणखी वाचा - २००७ मध्येच निवृत्तीचा विचार होता, पण सचिननं रोखलं - वीरेंद्र सेहवाग

कपिल देवनं हे वक्तव्य शेन वॉर्न, वसिम अक्रम आणि अयान बाथम यांच्या उपस्थितीत जुमेइरा हॉटेलच्या कोव बीच क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात केलं. यानंतर या सर्वांनीही सचिनबद्दल आपले मत स्पष्ट केले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.