नवी दिल्ली : पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटसंबंधी एक मोठी बातमी.... टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार २०१०मध्ये टीम इंडियाचा एक क्रिकेटर आपल्या रूममध्ये नाही तर एका महिलेसोबत दुसऱ्या रूममध्ये सापडला होता.
त्यावेळी श्रीलंका दौऱ्यादरम्यान बुकीशी लिंक असल्याचे आरोप ज्या क्रिकेटरवर लावण्यात आले होते. त्या क्रिकेटरचे या महिलेशी संबंधांचा खुलासा टाइम्स ऑफ इंडियाने केला आहे. हा क्रिकेटर चेन्नई सुपर किंगकडून खेळतो. या क्रिकेटरचा उल्लेख आयपीएल स्पॉट फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या मुदगल समितीच्या Individual 3 म्हणून करण्यात आला आहे.
वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार मुदगल समितीने श्रीनिवासनवर आरोप लावला आहे की त्यांनी क्रिकेटरवर कारवाई केली नाही. दरम्यान, बीसीसीआय सूत्रांनी सांगितले की श्रीनिवासन यांनी त्याच्यावर कारवाई केली होती.
बीसीसीआय वर्किंग कमेटीच्या बैठकीत २०१०मध्ये टीम इंडियाचे मॅनेजर असणारे रंजीब बिस्वाल यांनी त्या क्रिकेटर बद्दल तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांना सांगितले होते.
टाइम्स ऑफ इंडियाची बातमी
टीम इंडियाच्या क्रिकेटरवर टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे की, २०१० मध्ये टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असताना एक क्रिकेटर आपल्या रूममध्ये झोपला नव्हता. तो दुसऱ्या रुममध्ये एका महिलेसोबत सापडला होता. त्यावेळी क्रिकेटरचे त्या महिलेसोबत संबंधांचा खुलासा केला होता. या क्रिकेटरवर बुकीशी संबंध असल्याचा आरोपही लावण्यात आला होता. क्रिकेटर चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतो. या क्रिकेटरचा उल्लेख आयपीएल स्पॉट फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या मुदगल समितीच्या Individual 3 म्हणून करण्यात आला आहे.
राजीव शुक्ला यांचा दावा
या दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका चॅनलशी बोलताना सांगितले की, त्यांना त्या खेळाडूचे नाव माहीत आहे, पण ते नाव सांगणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.