फक्त २ मिनिटात जाणून घ्या, टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत कशी पोहोचेल?

ट्वेन्टी २० वर्ल्ड कप स्पर्धा खुपच रोमांचक स्थिती आली आहे. सोमवारी बांगलादेश हरवल्यानंतर ऑस्ट्रेलिया पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर भारत चौथ्या नंबरवर घसरला आहे. 

Updated: Mar 23, 2016, 08:23 PM IST
फक्त २ मिनिटात जाणून घ्या, टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत कशी पोहोचेल? title=

मुंबई : ट्वेन्टी २० वर्ल्ड कप स्पर्धा खुपच रोमांचक स्थिती आली आहे. सोमवारी बांगलादेश हरवल्यानंतर ऑस्ट्रेलिया पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर भारत चौथ्या नंबरवर घसरला आहे. 

टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन सामने जिंकण्याची गरज आहे. यातील एक सामना टीम इंडियाला २३ मार्च बंगलुरूमधील बांगलादेशविरोधात आणि दुसरा सामना २७ मार्च रोजी मोहाली विरोधात जिंकावा लागणार आहे. 

भारत आता चौथ्या स्थानावर आहे.

भारताला बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरोधात सामना जिंकणे आवश्यक आहे. तरच टीम इंडिया सेमी फायनल जाऊ शकते.

जर टीम इंडियाने बांगलादेशला हरवलं आणि २७ मार्चला ऑस्ट्रेलियाला हरवलं तर भारताचे ६ पॉईंट होतील, यानंतर भारत सरळ सेमीफायनलमध्ये जाईल, तेव्हा भारताला रनरेट सुधारण्याची गरज नसेल.

जर टीम इंडिया बांगलादेशविरूद्ध आज जिंकली, आणि २७ मार्चला ऑस्ट्रेलियाविरूद्ध हरली तर ४ पॉईंट होतील.

जर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं तर त्यांचेही ४ पॉईंट होतील.

आतापर्यंत दोन सामने हरणारी पाकिस्तान टीम ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकली तर त्यांचेही ४ पॉईंट होतील.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत तर एक सामना हरला, तर भारताचेही ४ पॉईंट होतील.

अशावेळी ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला पाहिजे.

जर बांगलादेशने  भारत आणि न्यूझीलँडला हरवलं, तर बांगलादेशचेही ४ पॉईंट होतील.

असं झालं तर भारत पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचे ४-४ पॉईंट होतील.

जर अशी स्थिती तयार झाली, तर रन रेटच्या आधारावर सेमी फायनलिस्ट निवडला जाईल. भारताला हा सामना मोठ्या अंतराने जिंकावा लागणार आहे, तेव्हाच रनरेट सुधारू शकतो.