नवी दिल्ली : नुकताच लॉस एंजेलिसच्या डॉब्ली थिएटरमध्ये ८८वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. हॉलीवूडमध्ये ऑस्करला बहुमानांकित पुरस्कार सोहळा मानले जाते. पण समजा हॉलीवूडप्रमाणेच क्रिकेटमध्येही ऑस्कर पुरस्कार देण्याची प्रथा असती तर कोणाला मिळाले असते हे पुरस्कार
बेस्ट एंटरटेनर - ब्रेंडन मॅकक्युलम
क्रिकेटमध्ये ऑस्कर पुरस्कार असल्यास बेस्ट एंटरटेनरचा पुरस्कार न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅकक्युलमला मिळेल. नुकताच हा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. मात्र त्याचा खेळ क्रिकेटरसिकांसाठी एंटरटेनिंग गेम असायचा. नुकतेच त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक लगावले.
बेस्ट डायलॉग - महेंद्रसिंग धोनी
धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विजयाचे दावेदार मानले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एमएस धोनीचा हेलिकॉप्टर शॉट सामन्यात पाहायला मिळालेला नाही. यावर एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर धोनीने जबरदस्त उत्तर दिले. त्याच्या या डायलॉहगला ऑस्करमध्ये बेस्ट डायलॉगचा पुरस्कार मिळाला असता.
बेस्ट जोक्स - क्रिकेटर जिम्मी निशाम
हा पुरस्कार न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जिम्मी नीशामला मिळाला असता.
बेस्ट पार्टनर - क्रिकेटर अॅडम
बेस्ट पार्टनरचा ऑस्कर पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर अॅडमला मिळाला असता.
बेस्ट शॉर्ट फिल्म - ख्रिस गेल
क्रिकेटच्या टी-२० फॉर्ममध्ये झंझावाती खेळ करणारा ख्रिस गेलला बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला असता.
जीवनगौरव पुरस्कार - वीरेंद्र सेहवाग
ऑस्कर पुरस्कारांमधील क्रिकेटमधील जीवनगौरव पुरस्काराचा मानकरी भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग ठरला असता.
बेस्ट डेब्यू - कॅगिसो रबाडा
क्रिकेटमधील सर्वोत्तम पदार्पणचा ऑस्कर पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाला मिळाला असता.