पल्लेकले : मॅक्सवेलने उडवला श्रीलंकेतच श्रीलंकन बॉलर्सचा धुव्वा उडवला आहे. मॅक्सवेलने 65 चेंडूत तूफानी 145 धावा ठोकल्या. ज्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावत 263 धावांचा डोंगर उभा केला.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या दमदार खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-ट्वेंटीमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे.
श्रीलंकेने 2007 साली केनियाविरुद्ध खेळताना 260 धावा केल्या होत्या. मॅक्सवेलने 49 धावांत शतक पूर्ण केलं. यामध्ये 14 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. यापूर्वी ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता.
मॅक्सवेलची ही खेळी ट्वेंटी-ट्वेंटीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी खेळी आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्याच एरॉन फिंचने इंग्लंडविरुद्ध 156 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाच्या वतीने तिसऱ्या विकेटसाठी ट्रेविस हेड आणि मॅक्सवेल यांनी 109 धावांची भागीदारी केली. मात्र शेवटच्या चेंडूवर ट्रेडचा बळी घेण्यास श्रीलंकेला यश आलं.