उंदराने घातला दरोडा!

चोरीची रक्कम फक्त साडेचार हजार रुपये असली तरी ही रक्कम पळविणारा कोणी सराईत चोरटा नाही. तर तो आहे उंदीर मामा…

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 29, 2013, 07:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूर शहराजवळील गांधीनगर परिसरात असणा-या एका वाईन शॉपमध्ये चोरी झाल्याचं उघड झालय. चोरीची रक्कम फक्त साडेचार हजार रुपये असली तरी ही रक्कम पळविणारा कोणी सराईत चोरटा नाही. तर तो आहे उंदीर मामा…
कोल्हापूरातील गांधीनगर मेन रोड इथं असणा-या वाईन शॉपच्या मालकाला आपल्या दुकानातुन साडेचार हजार रुपयांची चोरी झाल्याच सकाळी दिसुन आलं. त्यांनी दुकान न फोडता ही चोरी कोणी केली, याचा शोध घेतला तेव्हा सी.सी.टिव्ही फुटेजमध्ये पैसे पळविणारा उंदीर सापडला.

पहाटे चार ते सहा या वेळेत या उंदीर मामानं काउंटवर असलेल्या कॉश बॉक्समधुन एक एक करुन साडेचार हजार रुपयांची रोकड लंपास केली. पण या उंदीरमामानं पाच रुपयांच्या नोटा सोडल्या तर कोणत्याच नोटाना कुरतडलं नाही हे विशेष.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.