www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सोलापूर महापालिकेचं १ नंबर विभागीय कार्यालयाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. सोलापुरात मनसे नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर पालिकेच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्यानं कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली. मात्र पालिकेच्या आयुक्तांनी दखल न घेतल्यानं हे आंदोलन केल्याचं मनसेनं सांगितलं.
सोलापूर पालिकेच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आंदोलन केली मात्र पालिकेच्या आयुक्तांनी दाखल घेतल्या नसल्याने हे आंदोलन केले. पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि ड्रेनेजची सोय नसल्याने कार्यकर्त्यांनी आपला राग या आंदोलनातून व्यक्त केलाय .
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ