जनलोकपालसाठी अण्णांचं पुन्हा उपोषणास्त्र!

जनलोकपाल बनत नाही तोवर उपोषण करण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केलीय. उद्यापासून ते जनलोकपालसाठी उपोषण सुरू करत आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 9, 2013, 03:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, राळेगण सिद्धी
जनलोकपाल बनत नाही तोवर उपोषण करण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केलीय. उद्यापासून ते जनलोकपालसाठी उपोषण सुरू करत आहेत.
जनलोकपालच्या मुद्द्यावर सरकारनं विश्वासघात केल्याची टीका अण्णा हजारे यांनी केलीय. तर भ्रष्टाचार संपवण्याची सरकारी इच्छाच नसल्याचा आरोप अण्णांनी केलाय. जनलोकपाल आणला नाही म्हणून काँग्रेसचा चार राज्यात दारूण पराभव झाल्याचा दावा अण्णांनी केलाय.
राळेगणसिद्धीतून उद्यापासून अण्णा हे बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत. या आंदोलनासाठी तयार पूर्ण झालीय. राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषदेत अण्णांनी आपली भूमिका विषद केली. काँग्रेसनं देशाचा विश्वासघात केलाय, अशी टीका करुन जनलोकपालसाठी ‘करो या मरो’ असा निर्धार अण्णांनी यावेळी व्यक्त केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.