दत्ता मेघे अखेर भाजपच्या वाटेवर

काँग्रेसचे दत्ता मेघे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Jun 5, 2014, 06:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
काँग्रेसचे दत्ता मेघे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. पक्षात सतत अपमानजनक वागणूक मिळत असल्याने आपण, पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याचं दत्ता मेघे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि परत काँग्रेस असा प्रवास करणारे माजी खासदार दत्ता मेघे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. दत्ता मेघे भाजपच्या वाटेवर आहेत. या संबंधी पक्षाच्या स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचं त्यांच्या जवळच्या सुत्रांनी सांगितलं.
गेले ३५ वर्ष राजकारणात असलेल्या मेघे यांची गेल्या काही वर्षापासून कॉंग्रेसमध्ये घुसमट होत होती आणि वर्धा जिल्हा आणि लोक सभा मतदार संघातील राजकीय हेवे-दाव्यामुळेच ते पक्षांतर करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. देवळीचे कॉंग्रेस आमदार आणि राज्य मंत्री रणजीत कांबळे आणि दत्ता मेघे यांचे वैर जगजाहीर आहे.
नुकत्याच झालेल्या लोक सभा निवडणुकीत दत्ता मेघे यांचा मुलगा सागर मेघे याचा पराभव झाला होता आणि या पराभवामागे रणजीत कांबळे असल्याची त्यांची भावना जगजाहीर आहे. पक्षात सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने ते काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.
दत्ता मेघे यांचा मुलगा सागर मेघे यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. नरेंद्र मोदी यांना केंद्रात बहुमत मिळाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रिघ लागली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.