टोलमुक्ती सापडली संकटात, कोर्टाने सुरू केला टोलनाका

निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं 44 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला खरा... मात्र मुंबई हायकोर्टाच्या एका निकालामुळं ही टोलमुक्ती संकटात सापडलीय... 

Updated: Dec 26, 2014, 07:28 PM IST
टोलमुक्ती सापडली संकटात, कोर्टाने सुरू केला टोलनाका title=

चंद्रपूर : निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं 44 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला खरा... मात्र मुंबई हायकोर्टाच्या एका निकालामुळं ही टोलमुक्ती संकटात सापडलीय... 

नागपूर-चंद्रपूर मार्गावरील ताडाली टोलनाका 1 डिसेंबरपासून बंद करण्याचा आदेश MSRDC ने दिला होता... चंद्रपूर शहरातील ४ उड्डाणपुलांच्या निर्मितीचा खर्च वसूल करण्यासाठी २००२ साली चंद्रपूर शहराच्या सीमेवर ताडाली गावाजवळ हा टोल सुरु करण्यात आला होता. 

या उड्डाणपुलांच्या निर्मितीसाठी खर्च झालेल्या ३० कोटी रुपयांच्या मोबदल्यात आता पर्यंत ७० कोटी वसूल झाले आहेत. भाजप आमदार शोभाताई फडणवीस यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ताडाली येथील टोल वसुलीला स्थगिती दिली होती. 

या स्थगितीला कंत्राटदार सहकार ग्लोबल लिमिटेड कंपनीनं हायकोर्टात आव्हान दिलं. हायकोर्टानं सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवत, टोलवसुली पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. 

आघाडी सरकारनं निवडणुकीआधी राज्यातील ४४ टोलनाके बंद केले होते. हे सर्व कंत्राटदार न्यायालयीन लढाई लढत आहेत. चंद्रपूरच्या निर्णयाचा आधार घेतल्यास राज्य सरकारच्या टोलमुक्तीच्या प्रयत्नांना सुरुंग लागणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.