मोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी

मोनो रेलच्या दादर पूर्व या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागलीय. 

Updated: Mar 1, 2017, 12:10 PM IST
मोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी  title=

मुंबई : मोनो रेलच्या दादर पूर्व या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागलीय. 

मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्यात 'दादर पूर्व' हे स्थानक उभारण्यात आलंय. दुसरा टप्प्यावर अजूनही काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल, असं सांगण्यात येतंय. 


वारकऱ्यांचं आंदोलन

'दादर पूर्व' हे स्थानक वडाळ्याच्या राम मंदिराजवळच असलेल्या विठ्ठल मंदिरालगत आहे. हे विठ्ठल मंदिर 'प्रतिपंढरपूर' म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे, या स्थानकाचं 'दादर पूर्व' असं नामकरण न करता 'प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर स्थानक' असं करण्यात यावं, यासाठी आज वारकऱ्यांनी उपोषण केलंय. 

याच मागणीसाठी मोनो रेलच्या दादर पूर्व स्थानकाखाली वारकारी बुधवारी सकाळी ठिय़्या मांडून बसले.