मनसेच्या चित्रपट सेनेत मोठे बदल, सुद्रीकची उचलबांगडी

राज कुंद्रा यांच्या सेटच्या तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष विलास सुद्रिक याला मोठी किंमत चुकवावी लागलीय. सुद्रिक याची या पदावरून उचलबांगडी करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 18, 2013, 11:31 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज कुंद्रा यांच्या सेटच्या तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष विलास सुद्रिक याला मोठी किंमत चुकवावी लागलीय. सुद्रिक याची या पदावरून उचलबांगडी करण्यात आलीय.
फिल्मायर स्टुडियोमध्ये राज कुंद्रा यांच्या ‘सुपर फाईट लीग’चं शूटिंग सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं इथं जाऊन तोडफोड केली होती. त्यानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता, मनसे चित्रपट कर्मचारी सेनेत मोठे फेरबदल केल्याचं पक्षाकडून जाहीर करण्यात आलंय.
महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, विनय येडेकर, केदार शिंदे, अतुल परचुरे आणि संजीव देशपांडे अशा चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ही माहिती दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.