मुंबई : मुंबईत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघढकीस आलीय. हे दोघेही नराधम रिक्षाचालक आहेत.
मुंबईतल्या कुर्ला परिसरात १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका रिक्षा चालकला अटक करण्यात आलीय. याप्रकरणी रिक्षा चालकाचा साथीदार रिक्षा चालक फरार आहे.
नेहरूनगर एसटी डेपोवरून घरी परत येताना मुलीसोबत हा भयानक प्रकार घडला. मुलगी एकटी बघून रिक्षा चालकानं तिच्यावर अत्याचार केला. मुलीनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली... आणि पुढे जाऊन आणखी एक रिक्षा केली.
पण तोही नराधमच निघाला. घाबरलेल्या मुलीला त्यानं त्याच्या वांद्र्यातल्या घरी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
मुलगी वेळेवर घरी आली नाही, म्हणून पालकांनी पोलिसात धाव घेतली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास रिक्षावाल्यानं मुलीला कुर्ल्यात सोडलं... आणि पळून गेला.
घरी पोहचल्यानंतर मुलीनं झाला प्रकार पालकांना सांगितल्यावर त्यांनी नेहरूनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांना मुलीनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केलीय.