गायिका आशा भोसले यांना पुत्रशोक

गायिका आशा भोसले यांना पुत्रशोक झाला आहे, प्रसिद्ध संगीतकार हेमंत भोसले यांचं निधन झालं, हेमंत भोसले यांचं स्कॉटलंडमध्ये कर्करोगावरील उपचारादरम्यान निधन झालं.

Updated: Sep 28, 2015, 09:12 PM IST
गायिका आशा भोसले यांना पुत्रशोक title=

मुंबई : गायिका आशा भोसले यांना पुत्रशोक झाला आहे, प्रसिद्ध संगीतकार हेमंत भोसले यांचं निधन झालं, हेमंत भोसले यांचं स्कॉटलंडमध्ये कर्करोगावरील उपचारादरम्यान निधन झालं.
 
हेमंत भोसले वर्षभरापासून कर्करोगाशी झुंजत होते. हेमंत भोसले यांच्यावर मागील सहा-सात वर्षांपासून स्कॉटलंडमध्ये उपचार सुरु होते. मात्र रविवारी रात्री भोसले यांची प्राणज्योत मालावली.
 
लता मंगेशकर यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला आलेल्या बातमीमुळे मंगेशकर कुटुंबासह संगीत क्षेत्रातही शोकाकुल वातावरण आहे. 
 
१९७० ते ८५ च्या दशकामध्ये भोसले यांनी दिलेल्या योगदानाची विशेष दखल घेण्यात आली होती. आखरी संघर्ष, अनपढ, दामाद, धरती आकाश, नजराना प्यार का, राजा जोगी यासारख्या चित्रपटातील गाणी त्या काळात गाजली होती.

शारद सुंदर चंदेरी राती, जा जा जा रे नको बोलू, मी अशी मोठी कशी गं, बाळा माझ्या नीज यासारखी हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेली मराठी गाणी विशेष गाजली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.