मुंबई : पाचशे आणि एक हजारच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला. या निर्णयानंतर नागरिक त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा बँकेत परत करण्यासाठी जात आहेत. यामुळे सगळ्याच बँकांमध्ये मोठ्याप्रमाणावर गर्दी होत आहे.
याआधी 1978साली मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनीही अशाच प्रकारे नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुंबईतल्या आरबीआयच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी मुंबईकरांनी अशीच गर्दी केली होती. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून हे फोटो शेअर केले आहेत.
#FlashbackSunday #MumbaiPolice doing bandobast outside RBI while #Mumbaikars wait to exchange their notes in 1978 pic.twitter.com/YiOBHXwCID
— Mumbai Police (@MumbaiPolice) 13 November 2016