नोकरी : सेबीमध्ये वाढणार कर्मचाऱ्यांची संख्या!

नोकरी शोधताय पण मिळत नाहीय... कशी मिळवावी नोकरी असे अनेक प्रश्न सतावत असतील ना? पण आता चिंता करण्याची गरज नाहीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 1, 2013, 11:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नोकरी शोधताय पण मिळत नाहीय... कशी मिळवावी नोकरी असे अनेक प्रश्न सतावत असतील ना? पण आता चिंता करण्याची गरज नाहीय. कारण तुमच्यासाठी खास चालून आलीय एक सुवर्णसंधी. जी तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकते. सेबी तुम्हाला देणार आहे ही संधी... सेबीमध्ये सुरु होतेय कर्मचाऱ्यांची भर्ती.
‘बाजार नियामक भारत सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड’ सध्या वेगाने वाढत चाललेल्या बाजाराचे योग्य तऱ्हेने नियमन करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतंय. यासाठी सेबीने आपली कर्मचारी संख्या वाढवण्याचे ठरवलंय. साधारण ५० टक्क्यांनी ही संख्या वाढवण्यात येणार आहे. या योजनेमुळे सेबीच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढून हजारावर जाण्याची शक्यता आहे.

सेबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही भरती चालू वित्तीय वर्षादरम्यान करण्यात येतील. सेबीमध्ये सध्या साधारणत: ६०० कर्मचारी कार्यरत आहेत आणि २०१५ – १६ पर्यंत कर्मचाऱ्यांची ही संख्या ९५० पर्यंत करण्याची शिफारस आधीच करण्यात आलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.