कलाम खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस - राज ठाकरे

लहानपणी ऋषी-मुनींच्या गोष्टी ऐकल्या होत्या. ती माणसं कशी होती, कशी राहात होती काही कल्पना नाही, पण ऋषी म्हटलं की डोळ्यापुढे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची मूर्ती येते. देशाला विज्ञानाचा मंत्र तर त्यांनी दिलाच पण तो देताना त्याला एक अध्यात्मिक बाजूही दिली. स्वत:ला जे समजलंय ते बाकीच्यांना सांगण्याची एक विलक्षण उर्मी त्यांच्यात होती. कलाम हे खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहली.

Updated: Jul 28, 2015, 01:59 PM IST
कलाम खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस - राज ठाकरे title=

मुंबई : लहानपणी ऋषी-मुनींच्या गोष्टी ऐकल्या होत्या. ती माणसं कशी होती, कशी राहात होती काही कल्पना नाही, पण ऋषी म्हटलं की डोळ्यापुढे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची मूर्ती येते. देशाला विज्ञानाचा मंत्र तर त्यांनी दिलाच पण तो देताना त्याला एक अध्यात्मिक बाजूही दिली. स्वत:ला जे समजलंय ते बाकीच्यांना सांगण्याची एक विलक्षण उर्मी त्यांच्यात होती. कलाम हे खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहली.

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना मला एकदाच भेटण्याची संधी मिळाली, पण राष्ट्रपती असलेल्या माणसानं कसं रहावं याचा खरा आदर्श त्यांनी घालून दिलेला मी त्यावेळी पाहिला... ते खरे 'भारतरत्न' होते. त्यांचे गुण आपल्या सर्वांना माहीत आहेत, ते पुन्हा सांगण्याची आज आवश्यकता नाही. आपल्या सर्वांना त्यांनी एक दृष्टी दिली, असे राज ठाकरे म्हणालेत.

मात्र खरं. भारत एक महासत्ता बनू शकतो आणि आपण जगाचं नेतृत्व करू शकतो याचा एक विश्वास त्यांनी आपल्या सर्वांना दिला. स्वप्न पाहायला शिकवलं. २०२० साली भारत कुठे जाईल, कुठे जावा हे सांगून त्यांनी आपल्याला एक रस्ता दाखवला. त्या रस्त्यानं पुढे जाऊन त्यांच्या या स्वप्नाची पूर्ती करणं हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे उद्गार राज यांनी काढलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.