या शाळेत सहा महिन्यांपासून शिक्षकांचा पत्ताच नाही

विनाशिक्षक शाळा केवळ राज्याच्या ग्रामीण भागातच पहायला मिळतात असं नाहीतर मुंबईसारख्या शहरातही पहायला मिळतात. मागाठाणे इथल्या पालिका शाळेतील काही वर्ग विनाशिक्षक सुरू आहेत, तेही गेल्या काही महिन्यांपासून.

Updated: Jan 10, 2016, 04:12 PM IST
 या शाळेत सहा महिन्यांपासून शिक्षकांचा पत्ताच नाही title=

मागोठणे : विनाशिक्षक शाळा केवळ राज्याच्या ग्रामीण भागातच पहायला मिळतात असं नाहीतर मुंबईसारख्या शहरातही पहायला मिळतात. मागाठाणे इथल्या पालिका शाळेतील काही वर्ग विनाशिक्षक सुरू आहेत, तेही गेल्या काही महिन्यांपासून.

कोंडीबाई वनगे मुंबईच्या नँशनल पार्कमधील चिंचपाडा येथून रोज अर्धा तास चालत येवून मागाठाणे इथल्या बीएमसी शाळेत नातीला सोडायला येतात. आदिवासी समाजातील कोंडीबाई शिकलेल्या नसल्या तरी नातीनं शिकून मोठं व्हावं यासाठी त्या धडपडतायत. परंतु त्यांची नात शिकत असलेल्या तिसरीच्या वर्गावर शिकवायला गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकच नाहीय.

हीच त-हा सहावीच्या वर्गाची. या वर्गावरील शिक्षक निवृत्त झालेत. परंतु त्यालाही अद्याप नवीन शिक्षक आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही वर्गात मुलांची टंगळामंगळ सुरू असते. तसंच शिक्षकच नसल्यामुळं विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची संख्याही कमी झालीय. 

मागाठाणेच्या या पालिका शाळेत 230 विद्यार्थी शिक्षण घेत असून तिसरीच्या वर्गात 22 तर सहावीच्या वर्गात 19 विद्यार्थी शिकत आहेत. यासंदर्भात आम्ही शिक्षण समिती अध्यक्षा आणि अधिका-यांना विचारणा केली असता, माहिती घेवून सांगण्याचे उत्तर मिळाली. मुंबई महापालिका शिक्षणावर हजारो कोटी रूपये खर्च करत आहे. तरीदेखील शहरात विनाशिक्षिका शाळा पहायला मिळत असतील तर यासारखे दुर्दैव तरी काय.