दिनेश दुखंडे, मुंबई : ठाकरे परिवार आणि प्राणीमात्र यांचं एक अतूट नातं आहे... मग ते वाघ-सिंहांचे बछडे असोत, माकडं असोत, पाळीव मासे असोत, नाहीतर कुत्रे... शर्मिला ठाकरेंना त्यांचा पाळीव कुत्रा चावला आणि ठाकरें घरच्या श्वानप्रेमाची चर्चा पुन्हा रंगू लागली...
जेम्स बाँडला कोण ओळखत नाही... सिर्फ नामही काफी है... पण आज आम्ही दाखवणार आहोत ते वेगळेच जेम्स बाँड... ग्रेट डेन जातीचे हे पाळीव कुत्रे... मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरातले जणू सदस्य... खरं तर जेम्स आणि बॉन्डची ही दुसरी पिढी आहे... आधीच्या जेम्स आणि बॉन्डची ही पिल्लं... ज्युनिअर जेम्स बॉन्ड... त्यांच्या सोबतीला काही वर्षांपूर्वी आणखी एक ग्रेट डेन आलाय... त्याचं शॉन असं बारसं करण्यात आलं. या तीन कुत्र्यांच्या सोबत कृष्णकुंजवर आणखी तीन पग जातीचे कुत्रे आहेत...सिम्बा-बॅम्बी आणि बोल्ट... या श्वान कुटुंबात आणखी काही सदस्य आहे... कन्या, घा-या, बबली अशी त्यांची नावं... म्हणजे जवळपास नऊ-दहा जणांची फॅमिली... राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः या प्रत्येकाचं नामकरण केलं.
रस्त्यावर एखादा भटका कुत्रा आढळला तरी राज त्याला बिस्किट खाऊ घालतात. त्यांच्या गाडीत कुत्र्यांसाठी बिकिस्टांचा साठा तयारच ठेवलेला असतो. आपल्या पाळीव कुत्र्यांची ते विशेष काळजी घेतात. अगदी पोटच्या मुलांसारखी... त्यांचे वाढदिवसही साजरे केले जातात...घरी पाहुणे आले की आवर्जून आपल्या कुटुंबातल्या या सदस्यांशीही त्यांची ओळख करुन दिली जाते. पाहुणा कितीही मोठा व्हीव्हीआयपी असला तरीही....
वाचा : पत्नीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी पाळीव कुत्र्यांची रवानगी केली फार्म हाऊसवर
यातला बॉन्ड सध्या गाजतोय तो वेगळ्याच कारणासाठी... राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना बॉन्ड चावला... नेमका चेह-यावर त्यानं चावा घेतल्यानं शर्मिला ठाकरेंना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागलं. त्यांच्या चेह-यावर 65 टाके घालावे लागले... या घटनेनंतर जेम्स बॉन्ड आणि शॉन या तिघांची रवानगी राज ठाकरेंनी कर्जतच्या फार्म हाऊसवर केलीय...
राज ठाकरे आपले काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं अनुकरण करतात असा नेहमीच त्यांच्यावर आरोप होतो. बाळासाहेबही श्वानप्रेमी होते. राज ठाकरेंनीही बहुदा वारसाहक्कानं हा गुण बाळासाहेबांकडून घेतला असावा....मातोश्रीवरही बाळासाहेबांच्या कुटुंबात मार्शल आणि मार्कोस हे दोन ग्रेट डेन सदस्य होते.
वाचा : शर्मिला ठाकरेंना 'बॉन्ड'नं घेतला चेहऱ्यावर चावा; डॉक्टरांनी घातले ६५ टाके
बाळासाहेबांकडून त्यांच्या कुटुंबात अनेकांनी हा वारसा घेतला. स्वतः उद्धव ठाकरे हे श्वानप्रेमी आहेत. बाळासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी तर फक्त पाळीव प्राणीच नव्हे तर जंगलातील प्राण्यांनाही लळा लावला. त्यांनी वाघ-बिबिट्यांच्या बछड्यांची निगा राखली. विविध जातीचे साप, सरडे, हरणं, अगदी सुसरीचं पिल्लूही जयदेव यांनी पाळलं होतं. दुर्मिळ जातीचं मार्मोसेट माकड त्यांच्याकडे होतं. त्यांनी त्याला मिकी हे नाव ठेवलं होतं. उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस यांनाही वाईल़्ड लाईफ विषयी प्रचंड आकर्षण आहे. त्यांचा हा छंद जोपासण्यासाठी मातोश्रीवर एक स्वतंत्र खोलीच आहे.
शिवाय वेगवेगळ्या जातीचे मासे त्यांनी पाळलेत. पोपटांमधली काकाकुआ जोडी त्यांच्याकडे आहे. विविध सरडे, पक्षी दुर्मिळ सापांचीही तिथे निगा राखली जाते. इतकचं काय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक वाघ आणि रस्टी कॅट दत्तक घेतलीय...एकूण काय ठाकरेंनी फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही लळा लावला...
पाहा हा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.