मुंबई पोलिसांना दिल जातंय कराटे प्रशिक्षण

पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत कुणी करू नये यासाठी मुंबई पोलिसांना तायक्वाँडोचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Updated: Oct 17, 2012, 02:04 PM IST

www.24taaas.com, मुंबई
पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत कुणी करू नये यासाठी मुंबई पोलिसांना तायक्वाँडोचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तायक्वाँडो या मार्शल आर्टच्या प्रकाराबरोबरच लाठीचार्ज, लाठी-ढाल तसेच मनोबल वाढविण्याचेही धडे देण्याची मोहीम सुरू झाली आहे.
मुंबई पोलीस दलातील ४० वर्षांखालील प्रत्येक पोलीस कॉन्स्टेबलला हे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. प्रत्येक झोनच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या आवारात हे प्रशिक्षण देण्यात येत असून झोनमधील पोलिसांना वेगवेगळ्या बॅचमध्ये विभागण्यात आले आहे.
५ ऑक्टोबरपासून दररोज सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत हे प्रशिक्षणवर्ग चालतात, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली. प्रशिक्षण वर्गाला पोलीस दांडी मारू नयेत. त्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना नाश्तासाठी दोन अंडी, ब्रेड-जाम आणि दूधदेखील देण्यात येते.