मुंबईत हायअलर्ट, १३ दहशतवादी घुसलेत

पावसाळा सुरू झाल्यावर आाता सणांचे वेध लागलेत. त्यासाठी मुंबई या हक्काच्या बाजार पेठेत खरेदीचा हंगाम सुरू होईल. पण सावधान...! सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घातपात करण्यासाठी १३ दहशतवादी घुसलेत असा गुप्तचर विभागाचा रिपोर्ट आहे. 

Updated: Jul 3, 2015, 04:42 PM IST
मुंबईत हायअलर्ट, १३ दहशतवादी घुसलेत title=

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर आाता सणांचे वेध लागलेत. त्यासाठी मुंबई या हक्काच्या बाजारपेठेत खरेदीचा हंगाम सुरू होईल. पण सावधान...! सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घातपात करण्यासाठी १३ दहशतवादी घुसलेत असा गुप्तचर विभागाचा रिपोर्ट आहे. 

२६-११ पेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी संघटना आहेत. मुंबई पोलिसांनी एकूण ७४१ ठिकाणं संवेदनशील म्हणून घोषीत केली आहेत. त्यापैकी १२८ संवेदनशील ठिकाणं दक्षिण मुंबईत आहेत. सर्वच वस्तूंची होलसेल मार्केट या भागात आहेत. यातल्या १०६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

मुंबईत डेव्हीड हेडलीने ज्या जागांची रेकी केली होती त्याठिकाणी हल्ले होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय. एकूण ९ ते १० ठिकाणी हे मोठे हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.