www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लग्नाचे जेवण तयार करताना आमरसाचा चमचा भाजीत घातल्याने रागावलेल्या कॅटर्सच्या कामगाराने दोघा आचार्यांवर चाकूने हल्ला केल्याची घटना गिरगाव परिसरात घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला.
अन्वर शेख (३५) असे आरोपीचे नाव असून, तो गिरगाव परिसरातील सीपी टँक येथील एका कॅटर्सकडे लेबरचे काम करतो. याच कॅटरिंगमध्ये सूरज पटेल (२२) आणि त्याचा मामा रमेश चौधरी (४५) हे आचारीचे काम करतात.
मंगळवारी मालाडमध्ये विवाहसमारंभात भोजन तयार करण्याची ऑर्डर त्यांच्याकडे होती. जेवण तयार करत असताना अन्वरने आमरसातील चमचा भाजीच्या पातेल्यात घातला. त्यावर सूरज आणि त्याचा काका अन्वरवर चिडले. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
चिडलेल्या सूरजने अन्वरच्या दिशेने चाकू फेकला. त्यात तो जखमी झाला. जेवण वेळेवर व्हावे यासाठी त्यांच्या इतर सहकार्यांकनी तिघांनाही समजावले. मात्र अन्वरचा राग कमी झाला नव्हता. बदला घेण्यासाठी तो बुधवारी सूरज राहत असलेल्या सीपी टँक परिसरात गेला. तेथे अन्वरने सुरजवर चाकूहल्ला केला; तसेच त्याच्या मामावरही वार केले. यामध्ये सूरजचा मृत्यू झाला तर मामा रमेश गंभीर जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणी अन्वरला अटक केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.