www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी यासारखे दाखले मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयीन सातत्याने चकरा माराव्या लागतात. आता मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. दाखले मिळण्यास लागणारा वेळ आणि रांगा टाळता येणार आहे.
कारण स्मार्ट फोनच्या जमान्यात ऑनलाइन सेवेचा लाभ घेण्याऱ्याची संख्या वाढण्यासाठी महानगरपालिका मोबाईल अॅप काढणार आहे. याद्वारे हे दाखले देण्यात येणार आहे.
या सेवेतून दहा दिवसांत मिळणारे दाखले केवळ दोन दिवसातचं मिळतील. मात्र त्यासाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागतील. सध्या जन्म-मृत्यूचे दाखलांची किंमत 12 रुपये आहे. मात्र ऑनलाईन अर्जाची किंमत अजून स्पष्ट कऱण्यात आलेली नाही.
रेल्वेच्या तत्काळ सेवा सुविधाप्रमाणे `नागरी प्रमाणपत्र` ही सेवा देण्यात येणार आहे. मोबाईल अॅप डाऊनलोड करुन अर्ज मोबाईलवरचं करता येईल. तसेच या अॅपमधून नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी कर, विवाह नोंदणीही करता येणार आहे. ही सेवा मे महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.