मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच फटकारलंय. शिवसेनेनं पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला जोरदार विरोध केला.
आणखी वाचा - पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कसुरींचा मोदीना टोला
कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शाई फासली. मात्र विरोध करण्यासाठी आणखी मार्ग आहेत. जे झालं त्यामुळं राज्याची बदनामी झाली. आम्ही आपल्या राज्याचे 'बनाना रिपब्लिक' बनवू देणार नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी शिवसेनेला खडसावलंय.
आणखी वाचा - शिवसेनेचं आंदोलन कायम, अफवांवर विश्वास ठेऊन नका - राऊत
यापूर्वी सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला सकाळी शाई फासली गेली. या घटनेचा अनेकांनी निषेध केला. मात्र आपण पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम करणारच हे त्यांनी जाहीर केलं. शिवसेनेनंही पत्रकार परिषद घेऊन आपला विरोध कायम असल्याचं म्हटलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.