मुंबई : घरात पाळणा हळला. मात्र, चार मुली होऊनशी मुलगा न झाल्याने मुलासाठी तिने अपहणाचा बनाव रचला. मात्र, हा बनाव तिच्या अंगाशी आला आणि तिला बेड्या पडल्या.
चार मुली आहेत. मात्र, मुलगा जन्माला आला पाहिजे असा दबाव घरातील मंडळींचा असल्याने एका महिले गरोदर असल्याचे नाटक केले. नऊ महिने झालेत. त्यानंतर तिने मुलासाठी बनाव रचला. शूटिंगच्या नावाखाली तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले. दरम्यान, यावेळी मुलाची चक्क खरेदी करण्यात येत होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने बाळाला विकत घेणाऱ्या आईबरोबर दोघा अपहरणकर्त्यांना देखील बेड्या ठोकल्या.
मोती विकणाऱ्या चिकू नावाच्या महिलेला एका सनी वाघेला नावाच्या व्यक्तीने गाठले आणि शूटिंगसाठी लहान मुलाची विचारपूस केली. चिकूला मूल नव्हते पण तिची मैत्रीण असलेल्या संजना बोबडे नावाच्या महिलेला तीन महिन्यांचे बाळ होते. चिकूने संजना आणि सनीची भेट घालून दिली. ठरलेल्या सौद्याप्रमाणे संजनाला तीन तासांचे १५ हजार मिळणार होते तर चिकूला दोन हजार. हे तिघेही चर्चगेट येथील इरॉस सिनेमा जवळ भेटले. सनीने सविताला १५ हजारांची हमी दिली आणि त्याचा सहकारी असलेल्या पंकज वाघेलांला आई सोबत उभे करून शूटिंगच्या बहाण्याने बाळाला घेऊन निघून गेला तो माघारी आलाच नाही.
संजनाने आपल्या बाळाचा शोध घेतला पण बाळाचा ठाव ठिकाणा लागला नाही. तिने आझाद मैदान पोलिसात तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांना काहीही माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी कसून तपासाची सूत्रे हलविलीत.
पोलिसांनी कामा हॉस्पिटल, इरॉस सिनेमा आणि ताज हॉटेल जवळील फोन कॉलचा डेटा काढला आणि त्यातील सामायिक नंबर वेगळे काढून त्याचे व्हाट्सअॅप प्रोफाइल फोटो हे बाळाच्या आईला दाखवले. तिने तात्काळ पंकजला ओळखले मग पोलिसांनी नालासोपाऱ्याला जाऊन पंकजला अटक केले. सनीपर्यंत पोहोचण्यास देखील त्यांना वेळ लागला नाही. या दोघानंतर पोलिसांनी आपला मोर्चाला बाळ विकत घेणाऱ्या महिलेकडे वळवला आणि आशा हेगडे नावाच्या महिलेला विरार येथून अटक केली.
आशाला चार मुली होत्या. पण मुलगा नव्हता, घरातून मुलगा पाहिजे असा दबाव सुद्धा होता म्हणून आशाने प्रेग्नेसीचे नाटक रचले. नेव्ही नगरमध्ये स्वीपरच काम करणा-या अशाला चार मुली होत्या, आशाने आपल्या नवऱ्याला सांगितले होत की मी प्रेग्नेंट असून यावेळी मला मुलगाच होणार. मात्र या मुलासाठी तिने सानीशी ४०,००० चा सौदा केल्याचे तपासात उघड झाले आहे.
दलालांनी पैशांच्या हव्याशा पोटी फुटपाथवर फुले विकून दिवस काढणाऱ्या संजनाचे बाळ खोटे सांगून पळवले आणि इथेच त्यांचे बिंग फुटले. खरं तर आशा हेगडेपेक्षा तिच्या घरचे ज्यांनी तिला मुलगा पाहिजेच याकरिता दबाव आणला होता, ते ही या प्रकरणी दोषी नाहीत, का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.