www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नाशिकचे लोकसभा उमेदवार छगन भुजबळ अडचणीत आलेत. तर सुरेश कलमाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
नवी दिल्लीचं महाराष्ट्र सदन तसंच मुंबईत अंधेरीचं आरटीओ कार्यालय आणि हायमाऊंट स्टेट गेस्ट हाऊसच्या कामात अनियमितता झाल्याचा ठपका विधिमंडळाच्या लोकलेखा समितीनं ठेवलाय. याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
कामाचा दर्जा, टेंडरशिवाय दिलं गेलेलं कंत्राट तसंच शासनाला यातून काही फायदा झाला नसल्याचा ठपका समितीनं ठेवलाय. दुसरीकडे युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील काही स्पर्धांशी संबंधित आयोजन समितीवर खटले दाखल करण्याची शिफारसही लोकलेखा समितीनं केली.
याला मुख्यमंत्र्यांनीही मंजुरी दिलीय. त्यामुळे या स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडींविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. काल विधानसभेत हा अहवाल सादर करण्यात आला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.