रिक्षा चालकाच्या मुलाला मिळालं बीबरच्या कार्यक्रमाचं 'गोल्डन तिकीट'!

ग्रॅमी अवॉर्ड विजेता प्रसिद्ध पॉप स्टार जस्टिन बीबर लवकरच भारतात येणार आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या त्याच्या कॉन्सर्टची त्याचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. जगभरात जस्टिनचे चाहते आहेत, भारतातही त्याच्या चाहत्यांची कमी नाही. 

Intern Intern | Updated: Apr 25, 2017, 12:28 PM IST
रिक्षा चालकाच्या मुलाला मिळालं बीबरच्या कार्यक्रमाचं 'गोल्डन तिकीट'!

मुंबई : ग्रॅमी अवॉर्ड विजेता प्रसिद्ध पॉप स्टार जस्टिन बीबर लवकरच भारतात येणार आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या त्याच्या कॉन्सर्टची त्याचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. जगभरात जस्टिनचे चाहते आहेत, भारतातही त्याच्या चाहत्यांची कमी नाही. 

मुंबईत होणाऱ्या त्याच्या कॉन्सर्टचे तिकिट खूप महाग आहे. सामान्य माणसाला ते परवडणारे नाही. परंतु मुंबईच्या एका रिक्षा चालकाच्या मुलाचे नशिब खुललंय  त्याला जस्टिनच्या या कॉन्सर्टचं 'गोल्डन तिकीट' मिळाले आहे. या तिकिटाची किंमत ७५,००० रुपये एवढी आहे. परंतु गोल्डन तिकीटीतून या मुलाला हे तिकीट मोफत मिळणार आहे.

रिक्षा चालकाचा मुलगा बीबरचा खूप मोठा चाहता आहे. त्याने अनेक वर्ल्ड टूर अधिकृत पेजवर बीबरच्या गाण्यावर प्रशंसक पोस्ट शेअर केल्या होत्या. या टूरचे आयोजक 'व्हाइट फॉक्स इंडिया'ने या प्रशंसकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बीबरच्या कॉन्सर्टचे तिकिट त्याला मोफत दिले आहे.

तसेच जस्टिन बीबरनेही ठरवले होते की हे तिकीट अशाच व्यक्तीला दिले जाईल जो त्याच्या गायकिची कदर करेल. हे गोल्डन तिकीट मिळालेल्या व्यक्तीला या कॉन्सर्टमध्ये बॅकस्टेज जाण्याची संधीही मिळणार आहे.

मुंबईच्या या २२ वर्षाच्या मुलाने बीबरला ट्विटरवरून प्रायव्हेट मॅसेज करून त्याची गाणी आवडत असल्याचे सांगितले होते. जस्टिन बीबरचा हा कॉन्सर्ट १० मेला मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमला होणार आहे.