मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या, यात फक्त मतदान पार पडलंय, निकाल अजून बाकी आहे.
अनेक ठिकाणी पहिल्या फेरीत ज्या ठिकाणी मतदान झाले, त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या भागात किती मतदान पडेल, आपण किती मतांनी विजय मिळवू या विषयी कार्यकर्त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तर लोकांनी प्रत्येक गावात आपल्याला किती मतं पडतील, याची आकडे मोड सुरू केली आहे, आपण किती मतांनी विजयी होणार याचा अंदाज बांधण्यास सुरूवात झाली आहे.
गावोगावी मित्रांना फोन करून आपल्या गावात कमळाला जास्त मतं पडली, की घड्याळीला याविषयी माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.
काही स्थानिक वर्तमान पत्रांनी जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात कोण विजयी होईल याचा देखील अंदाज बांधला आहे.