बाळासाहेब-राज ठाकरेंनी केलं मतदान

मुंबई महानगरपालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. शहर आणि उपनगरांमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या तीन तासांत ११ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Updated: Feb 16, 2012, 01:40 PM IST

www.24taas.com, मुंबई

 


मुंबई महानगरपालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. शहर आणि उपनगरांमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

 

 

मुंबई  पालिकेतील २२७ जागांसाठी मतदान होत आहे. २२३३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी, शिवसेना, भाजप आणि रिपाइं (आठवले गट) यांची युती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांमध्ये प्रमुख लढत आहे.

 

 

मुंबई महापालिकेसाठी एकूण १ कोटी दोन लाख ७९ हजार ३७७ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. पालिकेत शिवसेना-भाजप युतीची  १५ वर्षांपासून सत्ता आहे.