जे डे हत्येप्रकरणी 3055 पानांचे चार्जशीट

मुंबई क्राइम ब्रांच आज पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी मोक्का कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. 350 पानांचे चार्जशीट दाखल.

Updated: Dec 3, 2011, 06:52 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबई क्राइम ब्रांच आज पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी मोक्का कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. 3055 पानांचे  हे दाखल केलेले चार्जशीट आहे.

 

या प्रकणात आता पर्यंत पोलीसांनी 11 जणांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या सांगण्यावरून जे डे यांची हत्या करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रमुख सतीश काल्या, पॉलसन जोसेफ सह महिला पत्रकार जिग्ना वोरा हिचाही सहभाग आहे. 11 जून 2011ला पवई मध्ये जे डे यांची हत्या कऱण्यात आली होती. जे डे यांच्या हत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.आज दाखल होणा-या चार्जशीटमध्ये जे डे यांच्या हत्येमागचा कारणांचा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

महिला पत्रकार जिग्ना वोरा हिचाही सहभाग असल्याची माहीती पोलिसांनी दिली होती. मात्र, आजच्या चार्जशीटमध्ये जिग्ना वोरा नाव नाही. तसेच नव्याने  चार्जशीटमध्ये दाखल होण्याची शकयता आहे.