ठाणे सेंट्रल जेलमध्ये आरोपीकडून पोलिसांवर शस्त्राने हल्ला, दोघे जखमी

सेंट्रल जेलमध्ये आरोपीकडून कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यांवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यामुळे जेलमधील सुरक्षा धोक्यात आली आहे. कॉन्स्टेबल सुभाष राबडे यांच्या कान आणि डोक्यावर वार झालेत. तसचे अधिकारी पिशे यांच्यावर देखील हल्ल करण्यात आलाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 2, 2017, 07:14 PM IST
ठाणे सेंट्रल जेलमध्ये आरोपीकडून पोलिसांवर शस्त्राने हल्ला, दोघे जखमी title=

ठाणे : सेंट्रल जेलमध्ये आरोपीकडून कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यांवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यामुळे जेलमधील सुरक्षा धोक्यात आली आहे. कॉन्स्टेबल सुभाष राबडे यांच्या कान आणि डोक्यावर वार झालेत. तसचे अधिकारी पिशे यांच्यावर देखील हल्ल करण्यात आलाय. 

ठाणे मध्यवर्ती कारागृहात एका आरोपीनं कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केलाय. विशेष म्हणजे जेलमधली वाटी कापून त्यानं हे शस्त्र तयार केलं. या हल्ल्यात कॉन्स्टेबल सुभाष राबडे आणि अधिकारी पिशे जखमी झालेत. 

मोक्काचा आरोपी आरमान शेखने केला हा हल्ला केलाय. आपल्याला पुरेशा सुविधा मिळत नाहीत, तसेच तारीख असतानाही बाहेर काढलं जात नाही, या नाराजीतून आरमानने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. ठाणे जेलला गेल्या अनेक दिवसांपासून सक्षम अधीक्षक नसल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे.