हरियाणाचा सुमित कुमार हिंदकेसरी, फायनलमध्ये अभिजीत कटकेला धोबीपछाड

पुण्याच्या अभिजीत कटकेचं हिंदकेसरी होण्याचं स्वप्न अखेर अपूर्ण राहिलंय. 

Updated: Apr 30, 2017, 10:09 PM IST
हरियाणाचा सुमित कुमार हिंदकेसरी, फायनलमध्ये अभिजीत कटकेला धोबीपछाड title=

पुणे : पुण्याच्या अभिजीत कटकेचं हिंदकेसरी होण्याचं स्वप्न अखेर अपूर्ण राहिलंय. हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या सुमित कुमारनं पटकावलाय. फायनलमध्ये सुमित कुमारनं अभिजीत कटकेला धोबीपछाड दिलीय.

फायनलमध्ये सुरुवातीपासूनच सुमित कुमारचं वर्चस्व पाहायला मिळालं. अखेर दोन्ही फे-यांमध्ये वर्चस्व राखत सुमित कुमारनं अभिजीतला चीतपट केलं. अभिजीतला 2-9 ने असा पराभव स्वीकारावा लागलाय. अभिजीतचा पराभव झाल्यामुळे तमाम पुणेकरांसह महाराष्ट्राची निराशा झालीय.