मुंबई : एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना यंदा अडीच हजार रुपये तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस मिळणार आहे.
या बोनसबरोबरच कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबरचा पगार आणि जानेवारी ते ऑगस्टदरम्यानच्या थकीत महागाई भत्त्यापैकी तीन महिन्यांचा महागाई भत्ता दिवाळीपूर्वी मिळणार आहे.