RTI कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांच्यावर हल्ला

येथील RTI कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. वाडिया पार्कबाहेर अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली.

Updated: Jun 23, 2015, 06:39 PM IST
RTI कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांच्यावर हल्ला title=

अहमदनगर : येथील RTI कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. वाडिया पार्कबाहेर अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली.

मोभारकर यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी दहाच्या सुमारास मोभारकर वाडिया पार्क येथून बाहेर पडल्यानंतर अचानक ४ ते ५ अज्ञात लोकांनी येउन बेदम मारहाण केली. 

आपल्यावर झालेल्या हल्ला हा भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले आणि बांधकाम व्यवसायिक नजीर शेख यांच्या गुंडानी केल्याचा आरोप मिलिंद मोभारकर यांनी केला आहे. दरम्यान या संदर्भात अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.