मौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्या 'रॉनी गँग'ला अटक

ही बातमी आहे भरकटलेल्या तरुणाईच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी... चोरीच्या आरोपाखाली तीन तरुणांना अटक करण्यात आलीय. त्यांची पार्श्वभूमीचा तपास केल्यानंतर पोलिसांनाही चांगलाच हादरा बसलाय.  

Updated: Apr 3, 2015, 03:33 PM IST
मौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्या 'रॉनी गँग'ला अटक title=

सिंधुदर्ग : ही बातमी आहे भरकटलेल्या तरुणाईच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी... चोरीच्या आरोपाखाली तीन तरुणांना अटक करण्यात आलीय. त्यांची पार्श्वभूमीचा तपास केल्यानंतर पोलिसांनाही चांगलाच हादरा बसलाय.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही महीने उच्छाद मांडणाऱ्या सोनसाखळी आणि दागिने चोरांना पोलिसांनी जेरबंद केलंय. ही टोळी कोणा भुरट्या चोरांची नाही... तर पदवीधर असलेले या टोळीतले साथीदार प्रतिष्ठीत घरातले आहेत. 

२१ वर्षांचा अभिजीत मांजरेकर आणि बावीशीतले अमित वाळके आणि अक्षय बेलणेकर अशी या तीन आरोपींची नावं आहेत. यातला अभिजीत एलएलबीच्या पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. अमित पदवीधर आहे... तर अक्षय सिव्हील इंजिनिअर आहे. 

सुखवस्तू घरातल्या या सुशिक्षित तरुणांनी मौजमजा आणि चंगळ करण्याकरता, झटपट पैसे मिळवण्यासाठी चोऱ्या करणं सुरु केलं होतं. 'रॉनी गॅंग' नावानं त्यांनी स्वतःची टोळी स्थापली होती. 

रॉनी वन, रॉनी टू आणि रॉनी थ्री याच नावानं ते एकमेकांशी संवाद साधायचे... आणि चोरलेला ऐवज सोनाराला विकून, मिळालेल्या पैशांतून ते आपले शौक पूर्ण करायचे...

दरम्यान शहरातल्या प्रतिष्ठित कुटुंबातले हे तरुण असल्यामुळे पोलीस सावधपणे पावलं टाकत आहेत. या तिघांना न्यायालयाने ७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.