रायगडात शुद्ध पाण्यासाठी 'एनी टाइम वॉटर कार्ड'

रायगडमध्ये शुद्ध पाण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांना एटीडब्ल्यू अर्थात रायगडात शुद्ध पाण्यासाठी 'एनी टाइम वॉटर कार्ड' देण्यात आले आहे.

Updated: Dec 18, 2015, 04:33 PM IST
रायगडात शुद्ध पाण्यासाठी 'एनी टाइम वॉटर कार्ड' title=

अलिबाग : रायगडमध्ये शुद्ध पाण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांना एटीडब्ल्यू अर्थात रायगडात शुद्ध पाण्यासाठी 'एनी टाइम वॉटर कार्ड' देण्यात आले आहे.

बोर्झे ग्रामपंचायत आणि मेसकॉट कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आलाय. अदमासे बाराशे लोकसंख्या असलेलं पेण तालुक्यातलं बोर्झे गाव. खारपड असल्यानं पाणीटंचाई गावाच्या पाचवीलाच पुजलेली. त्यामुळे पाण्यावरुन गावात हमखास मारामाऱ्या व्हायच्या. मात्र आता या गावात सर्वांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळूलागलंय.

कोणत्याही शासकीय मदतीवीना किंवा लोकवर्गणी न काढता ही गावचे तरुण सरपंच महेंद्र ठाकूर यांनी ही किमया साधली. त्यासाठी त्यांनी मेसकॉट या कंपनीची मदत घेतली.. गावातल्या सहा ते सात एकराच्या जुन्या तलावावर जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला आणि ना नफा ना तोटा तत्वावर दहा रुपयांत २० लीटर पाणी पुरवण्यास सुरुवात केली.

मेसकॉट या कंपनीने प्रत्येक लाभार्थ्याला दोन जार, एक कॉकवाला जार आणि उत्तेजनार्थ ३५० रूपयाचे रिचार्ज केलेले फ्री एटीड़ब्ल्यू कार्ड म्हणजेच निर्मल वॉटर कार्ड दिलेत. यासाठी १ हजार रूपये अमानत रक्कम भरावी लागते. आता येथील महिला देखील हे कार्ड वापरून येथून शुद्ध पाणी भरून नेतात. 

पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील प्रत्येक गावात अशी पाच ते सहा एकराची तळी खूप दिसतात. पण मासेमारी, कपडे भांडी धुणे, गाईम्हशींच्या वापरामुळे ही तळी प्रदूषित झालीत. मात्र, बोर्झे गावाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पडीत तलावाचा केलेला वापर इतर गावांसाठीही अनुकरणीय असाच आहे.