वडगाव : पुण्यातील वडगाव शेरी परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन महिलांसह तिघांचा पर्दाफाश करून गुन्हे शाखेतील मोठे सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले आणि सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी वडगाव शेरी परिसरातील एका सोसायटीमधील फ्लॅटवर धाडसत्र टाकून दोन महिलांसह तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्याच्या ताब्यातून ३ मुलींची सुटका करून घेण्यात आली आहे. त्यातील दोन मुली या पुण्यातील असून एक मुलगी पश्चिम बंगालची आहे. या तीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
आरोपी लांबीयार आणि त्याच्या साथीदारांची पोलिस कसून चौकशी असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
यापूर्वीचे छापे
जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ६६ मुलींची सुटका केली आहे.त्यात ६४ तरूण आणि ३ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
पोलिसांनी पिटा कायद्याअंतर्गत आतापर्यंत २१ पुरूष आणि १२ महिलांवर कारवाई केली आहे. येत्या काळात देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यानी दिली आहे.