मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं महसूल मंत्री एकनाथ खडसेंना फोन केल्याचा आरोप आपच्या प्रीती मेनन यांनी केला होता. पण मुंबई पोलिसांनी मात्र मेनन यांचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. दाऊदनं खडसेंना असे कोणतेही फोन केलं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणाची आम्ही चौकशी केली, पण खडसेंच्या नंबरवरून सप्टेंबर 2015 ते एप्रिल 2016 मध्ये दाऊदला कोणतेही इनकमिंग किंवा आऊटगोइंग कॉल झाले नसल्याचं मुंबईचे जॉईंट सीसी अतुल कुलकर्णी म्हणाले आहेत.