मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झालाय. रस्त्यावर उभ्या असलेल्या इनोव्हा आणि स्विफ्टला भरधाव लक्झरी बसनं धडक दिलीये यात 17 जण जागीच ठार झालेत. 

Updated: Jun 5, 2016, 08:41 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात title=

पनवेल : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झालाय. रस्त्यावर उभ्या असलेल्या इनोव्हा आणि स्विफ्टला भरधाव लक्झरी बसनं धडक दिलीये यात 17 जण जागीच ठार झालेत. 

मृतांमध्ये 7 महिला, 4 पुरुष आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. तर 25 जण जखमी झालेत. या जखमींना कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.  

धडक दिल्यानंतर तीनही वाहनं 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली.. हायवे पोलीस आणि स्थानिक पोलिस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगानं सुरु आहे..