प्रशांत अंकुशरावसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : टीव्हीवरील रियालिटी शो आणि क्राइम प्रोग्राम्सचा लहान मुलांवर कसा वाईट परिणाम होतो, याची दोन ताजी उदाहरणं समोर आलीत... दुर्दैवानं त्यामध्ये दोघा लहान मुलांचे बळी गेलेत... प्रत्येक पालकानं डोळे उघडे ठेवून पाहावा, असा हा खास रिपोर्ट...
पालकांनो, ही दृश्य जरा डोळे उघडे ठेवून पाहा... टीव्ही प्रोग्राम्स आणि रियालिटी शोमधले हे स्टंट तुमच्याही मुलांच्या जीवावर बेतू शकतात. कांजुरमार्गमधल्या सोहम मोरे या अवघ्या 11 वर्षांच्या चिमुकल्याचा असाच जीव गेला. आईवडिल घरी नसताना सोहम आणि त्याचा धाकटा भाऊ आईच्या ओढणीनं स्पायडरमॅनचा गेम खेळत होते. सोहमनं ओढणी गळ्याला बांधली आणि दुसरं टोक छताच्या पाइपाला बांधून उडी घेतली... पण बिच्चा-या सोहमचा गळफास लागून दुर्दैवी अंत झाला.
तर नाशिकमध्ये क्राइम सिरीयल्स पाहून एका 17 वर्षांच्या मुलानं चक्क आपल्या मित्राचं अपहरण केलं, 20 लाखांची खंडणी मागितली आणि मोहितेश बाविस्कर नावाच्या या मित्राचा खूनही केला. 19 वर्षांच्या आकाश प्रभू नावाच्या मित्राच्या मदतीनं त्यानं मोहितेशला दगडाने ठेचून ठार केलं. हा सगळा प्लान क्राइम स्टोरी पाहून आखल्याचं त्यानं कबूल केलंय.
खून केल्यानंतर काहीच घडलं नाही, अशा थाटात हे आरोपी कॉलेजला गेले. मित्राच्या घरी जाऊन कुटुंबियांच्या दुःखातही सहभागी झाले. त्यांच्या या अशा मानसिकतेबद्दल चिंता व्यक्त होते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रथमेश सुळे
ही रियालिटी पाहता आता पालकांनीच मुलांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तुमची मुलं करतात काय? हे पाहण्याची जबाबदारी आता पालकांचीच असणाराय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.