कोकण-नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, पेण-खेडात पुराचे पाणी

गेल्या तीन दिवसांपासून कोकणात पावसाच जोर वाढलेला दिसत असून संततधार सुरुच आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. या पुराचे पाणी खेडशहरात घुसले आहे. तर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. येथील धरणं भरलीत.

Updated: Jul 31, 2014, 01:38 PM IST
कोकण-नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, पेण-खेडात पुराचे पाणी title=

रत्नागिरी, नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून कोकणात पावसाच जोर वाढलेला दिसत असून संततधार सुरुच आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. या पुराचे पाणी खेडशहरात घुसले आहे. तर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. येथील धरणं भरलीत.

रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरु आहे. संगमेश्वर, साखरपा, खेड, दापोली, चिपळूण आदी परिसरात चांगला पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाचा फटका खेडला बसलाय. खेड बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा आहे. तर रायगडमध्ये पावसाचा जोर आहे. येथील नद्यांची पातळीत वाढ झाली आहे. पेणमध्ये पुराचे पाणी घुसले असून पेण एसटी स्थानकात पाणी साचलेय.

नाशिक शहरात दोन दिवसांपासून सुरू असणा-या पावसाने धरणं भरलीत. पेरण्या सुरू झाल्याने समाधानाचं वातावरण जरी असलं तरी याच पावसाने नाशिक महापालिकेच्या कारभाराच पितळ उघड केलंय. 

नाशिक शहरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरल असून ठिकठिकाणी रस्त्याची चाळण आणि खडडे दिसून येतात. शहरातील जुने रस्ते असो अथवा नव्याने मलमपट्टी करण्यात आलेले रस्ते अशा जवळपास सगळ्याच रस्त्यांना खड्डे पडायला सुरवात झाल्याने वाहनचालकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्यात. 

नाशिक-मुंबई दरम्यान कसारा घाटात दरड कोसळ्याने मनमाड ते मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. नाशिक, देवळाली आणि इगतपुरी स्टेशनवर रेल्वे थांबविण्यात आल्या तर काही ट्रेन्स मनमाडमार्गे वळविण्यात आल्या. दरड हटवून रेल्वे मार्ग सुरु करण्यात आला. पाच ते सहा तास खोळंबा झाल्याने स्टेशनवर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.