कोल्हापूर-रत्नागिरीत काँग्रेसला खिंडार, सेनेत आनंद

कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसला खिंडार पडलंय. काँग्रेस नेते आणि कागलचे माजी आमदार संजय घा़डगे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तर राधानगरीच्या प्रकाश आबिटकरही शिवसेनेच्या तंबूत दाखल झाले आहेत. तर रत्नागिरीत सुभाष बने पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.

Updated: Sep 18, 2014, 04:59 PM IST
कोल्हापूर-रत्नागिरीत काँग्रेसला खिंडार, सेनेत आनंद title=

कोल्हापूर, रत्नागिरी : कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसला खिंडार पडलंय. काँग्रेस नेते आणि कागलचे माजी आमदार संजय घा़डगे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तर राधानगरीच्या प्रकाश आबिटकरही शिवसेनेच्या तंबूत दाखल झाले आहेत. तर रत्नागिरीत सुभाष बने पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या दोघांनी शिवसेना प्रवेश केलाय. लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात शिवसेनेला अपयश आलं असलं तरी विधानसभेच्या यशनं ते धुवून काढा असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. 

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातले संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवलाय. बने हे नारायण राणे समर्थक असून त्यांनी राणेंसोबत २००५ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

सुभाष बने पुन्हा आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात सुभाष बने यांनी काही वेळा पूर्वी झी मीडियाला दिलेली प्रतिक्रिया ऐकूया.
 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नेत्यांचं आऊटगोईंग सुरू झालंय, तर शिवसेना-भाजपामध्ये फ्री इनकमिंग सुरू झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजातून अनेक नेत्यांनी उड्या मारायला सुरुवात केल्यानं आघाडीत अस्वस्थता आहे, याउलट महायुतीला मात्र आनंदाचं भरतं आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.