गोकुळनंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक

गोकुळनंतर आता कोल्हापुरात आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होतेय. उद्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या १२ तालुक्यांसह शहरात मतदान प्रक्रिया पार पडणारेय. तर मतमोजणी ७ मेला रमणमाळा इथं पार पडणारेय. 

Updated: May 4, 2015, 11:11 PM IST
गोकुळनंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक title=

कोल्हापूर: गोकुळनंतर आता कोल्हापुरात आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होतेय. उद्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या १२ तालुक्यांसह शहरात मतदान प्रक्रिया पार पडणारेय. तर मतमोजणी ७ मेला रमणमाळा इथं पार पडणारेय. 

कोल्हापूर जिल्हयातला सहकाराचा वटवृक्ष म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिलं जातं. पण याच वटवृक्षाच्या फांद्या अनेक संस्थांबरोबर त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या राजकीय नेत्यांनी तोडल्यामुळं शासनाला बँकेवर प्रशासक नेमावा लागला होता. आता स्थिती चांगली झाल्यामुळं बँकेची पंचवार्षिक निवडणूक होतेय. बँकेवर आपली सत्ता स्थापण करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं रणशिंग फुंकलंय. तर पक्षापेक्षा स्वत:च्या फायद्यासाठी शिवसेनेचे संजय मंडलिक काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देतायत.

तर बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेना-भाजपनं आव्हान दिलंय. त्यामुळे मतदार आता नेमकी काय भूमिका घेतात हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.